Saturday, 30 January 2016

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार..

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार
कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !!
================================================

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो



कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "
                                           

===============================================

तू सोबत असताना..........

तू सोबत असताना..........
तू सोबत असताना, ऋतुंनीही कूस बदलावी
वसंतातल्या भास्कारासही मेघांनी शाल पांघरावी.....

तू सोबत असताना, श्रावणातला पाऊसही बरसावा
आपल्याला भिजवताना तो स्वत:च भिजून जावा....

तू सोबत असताना, सप्तरंगांची छटा दिसावी
इन्द्रधनुष्यासहि जणू आपुली इर्षा व्हावी ....

तू सोबत असताना, सप्तसुरांची उधळण व्हावी
चाफ्या प्रमाणे सुरकुसूमे ती, तुझ्या केसांत मी गुंफावी.....

तू सोबत असताना, मी तुझ्यात हरपून जावे
नयनांच्या प्याल्याने तुझे सौंदर्य पितच रहावे........

गुलमोहर फुलताना तुझ्यासोबतच पहावं
गुलमोहरासारख फूलन तुझ्यासोबतच जगाव .......

                               ..... nitesh hodabe
================================================

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी....

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी


अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...


कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

==================================================

काही नाती बांधलेली असतात...

काही नाती बांधलेली असतात


काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री...
                             unknown author
=======================================

चुंबन.....

 चुंबन.....


हजारदा तिला मी सतावले असेन
न विचार करता तिची मर्जी असेन नसेन
जवळ घेऊन घट्ट आवळले-चावले असेन
पण तिने कधी हि नाही म्हटले नसेन

जवळ घेतलं तिला
अन तेवढ्यात फोन आला
अस काही होईल वाटलच नव्हत
काहीतरी वेगळच मिळेल पटलच नव्हत

जाव दूर तिच्यापासून तेच तिने ओढलं
डोळ्यांत पाहून माझ्या तिचे विष माझ्या डोळ्यांत सोडलं
उराला उर स्पर्शाला अन मी सर्व विसरून गेलो
केसांना माझ्या दिले तिने झटका आणि मी कळवळलो...

ओढून जरा जोरात माझ्या केसांना घट्ट धरून ठेवले होते
मला काही समजण्याआधीच ओठांत ओठ गुंतले होते
स्पर्श तिच्या पाकळ्यांचा आज नवीनच होता
माझ्या तापलेल्या ओठांना जणू  झराच मिळाला होता

श्वास माझा कोंडल्याच जाणवत होता
असा तिचा वेग माझ्यापेक्षा हि अनावर होता
पण हे विसरून मी हि स्व:ताला झोकून दिले
कमरेभावती हात टाकून अजून तिला जवळ केले

क्षणभराचा तो खेळ कधीहि नाही विसरू शकलो
पहिले तिचे चुंबन मी अजून नाही पचऊ शकलो
मित्रांनी ओठांना झालेल्या इजांची चेष्टेत विचारपूस केली
मी काय उत्तर देणार तिने माझीच जरवली

त्यानंतर मात्र अशी काही लाजली होती
माझ्याच मिठीत येऊन खूप वेळ लपून होती
आश्चर्य आणि प्रेमात मला एक मात्र कळल होत
तीच प्रेम माझ्यापेक्षाही जास्त बोलक होत

पण अजून सांगतो ते मात्र शेवटच होत
आयुष्यभर पुरेल अस तीच पाहिलं चुंबन होत
नेहमीसाठी या जगातून गेली तरी तोच स्पर्श मदहोश करतो
म्हणूनच या जन्मापासून दुसऱ्या जन्मात आयुष्यभराच्या सोबतीसाठी रोज प्रार्थना करतो...

                                                   ----सौ. संध्या बाळासाहेब कनकुटे
===========================================================

Wednesday, 27 January 2016

|| तू अन मी ||

|| तू अन मी ||
 =========

 तू बंदिस्त सिद्धांतात
 मी मुक्त आसमंतात..!! तू प्राजक्त अंगणात
 मी आसक्त सुमनात..!!
 तू असते संभ्रमात
 मी हरवतो प्रेमात..!!
 तू मोहरते मनात
 मी आतुरल्या क्षणात..!!
 तू बोलतेस मौनात
 मी उत्साही वदनात..!!
 तू रती एक साक्षात
 मी लुब्ध मदनबाणात.!!

                           सुनिल पवार....