Saturday, 30 January 2016

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार..

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार
कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !!
================================================

No comments:

Post a Comment