ती म्हणते ......
ती म्हणते वेळ काढून
मलाही थोड भेटत जा ,
प्रत्यक्षात नाही झाल तर

ती म्हणते नको होऊस भाऊक
स्वताच्या भावनांना आवर घालत जा ,
दिली कुणी आपुलकीची साद तर
त्या नात्याला शेवटपर्यंत टिकवत जा !
ती म्हणते हृदयाची हाक ऐक
आणि क्षणभंगुर जीवनात प्रत्येक क्षण जपत जा ,
तो असेलही दुःखाचा नि सुखाचा पण
याचा समावेश किमान कवितेत तरी करत जा !
ती म्हणते वेळ मिळालाच तर
समोरच्या व्यक्तीच्या भावना समजत जा ,
एखादी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही तरी
ती मिळेलच म्हणून जिद्द उराशी बाळगत जा !
कवी :- विजय वाठोरे सरसमकर
9975593359
दि .24/01/2016
sahilwathore.blogspot.in
marathikavitamaherghar.blogspot.in
=====================================================
No comments:
Post a Comment