बदल परिस्थितीचे ........!
कुणी आपुलकीने म्हटलेले दोन शब्द
आपल्या मना आधार देऊन जातात
नाविन्याचा ध्यास अन
जगण्याची नवी दिशा देऊन जातात !
कुणाच्या स्नेह नजरा
वेलीसारख्या आशा देऊन जातात
तर कुणाच गहिवरलेल बोलण
दगडासही पाझर फोडून जातात !
परिस्थितीचे बदल सर्वांनाच
एका वेगळ्या वळणावर घेऊन जातात
अन सैरभैर त्या विचारांना
खरच प्रचंड बदलून जातात !
काही वेळा परिस्थिती सतावते अन
नकळतच बदल घडवून येतात
तेव्हा .................
'तू कुठेच चुकत नाहीस ग
परिस्थितीनेच मला बदललंय '
अस वक्तव्य सहज घडून येतात !
कवी :- विजय वाठोरे सरसमकर
मो .नं. 9975593359दि :- २१ जानेवारी २०१६
=======================================================================
No comments:
Post a Comment