Saturday, 30 January 2016

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार..

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार
कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !!
================================================

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो



कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "
                                           

===============================================

तू सोबत असताना..........

तू सोबत असताना..........
तू सोबत असताना, ऋतुंनीही कूस बदलावी
वसंतातल्या भास्कारासही मेघांनी शाल पांघरावी.....

तू सोबत असताना, श्रावणातला पाऊसही बरसावा
आपल्याला भिजवताना तो स्वत:च भिजून जावा....

तू सोबत असताना, सप्तरंगांची छटा दिसावी
इन्द्रधनुष्यासहि जणू आपुली इर्षा व्हावी ....

तू सोबत असताना, सप्तसुरांची उधळण व्हावी
चाफ्या प्रमाणे सुरकुसूमे ती, तुझ्या केसांत मी गुंफावी.....

तू सोबत असताना, मी तुझ्यात हरपून जावे
नयनांच्या प्याल्याने तुझे सौंदर्य पितच रहावे........

गुलमोहर फुलताना तुझ्यासोबतच पहावं
गुलमोहरासारख फूलन तुझ्यासोबतच जगाव .......

                               ..... nitesh hodabe
================================================

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी....

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी


अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...


कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

==================================================

काही नाती बांधलेली असतात...

काही नाती बांधलेली असतात


काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री...
                             unknown author
=======================================

चुंबन.....

 चुंबन.....


हजारदा तिला मी सतावले असेन
न विचार करता तिची मर्जी असेन नसेन
जवळ घेऊन घट्ट आवळले-चावले असेन
पण तिने कधी हि नाही म्हटले नसेन

जवळ घेतलं तिला
अन तेवढ्यात फोन आला
अस काही होईल वाटलच नव्हत
काहीतरी वेगळच मिळेल पटलच नव्हत

जाव दूर तिच्यापासून तेच तिने ओढलं
डोळ्यांत पाहून माझ्या तिचे विष माझ्या डोळ्यांत सोडलं
उराला उर स्पर्शाला अन मी सर्व विसरून गेलो
केसांना माझ्या दिले तिने झटका आणि मी कळवळलो...

ओढून जरा जोरात माझ्या केसांना घट्ट धरून ठेवले होते
मला काही समजण्याआधीच ओठांत ओठ गुंतले होते
स्पर्श तिच्या पाकळ्यांचा आज नवीनच होता
माझ्या तापलेल्या ओठांना जणू  झराच मिळाला होता

श्वास माझा कोंडल्याच जाणवत होता
असा तिचा वेग माझ्यापेक्षा हि अनावर होता
पण हे विसरून मी हि स्व:ताला झोकून दिले
कमरेभावती हात टाकून अजून तिला जवळ केले

क्षणभराचा तो खेळ कधीहि नाही विसरू शकलो
पहिले तिचे चुंबन मी अजून नाही पचऊ शकलो
मित्रांनी ओठांना झालेल्या इजांची चेष्टेत विचारपूस केली
मी काय उत्तर देणार तिने माझीच जरवली

त्यानंतर मात्र अशी काही लाजली होती
माझ्याच मिठीत येऊन खूप वेळ लपून होती
आश्चर्य आणि प्रेमात मला एक मात्र कळल होत
तीच प्रेम माझ्यापेक्षाही जास्त बोलक होत

पण अजून सांगतो ते मात्र शेवटच होत
आयुष्यभर पुरेल अस तीच पाहिलं चुंबन होत
नेहमीसाठी या जगातून गेली तरी तोच स्पर्श मदहोश करतो
म्हणूनच या जन्मापासून दुसऱ्या जन्मात आयुष्यभराच्या सोबतीसाठी रोज प्रार्थना करतो...

                                                   ----सौ. संध्या बाळासाहेब कनकुटे
===========================================================

Wednesday, 27 January 2016

|| तू अन मी ||

|| तू अन मी ||
 =========

 तू बंदिस्त सिद्धांतात
 मी मुक्त आसमंतात..!! तू प्राजक्त अंगणात
 मी आसक्त सुमनात..!!
 तू असते संभ्रमात
 मी हरवतो प्रेमात..!!
 तू मोहरते मनात
 मी आतुरल्या क्षणात..!!
 तू बोलतेस मौनात
 मी उत्साही वदनात..!!
 तू रती एक साक्षात
 मी लुब्ध मदनबाणात.!!

                           सुनिल पवार....

क्षण मिठीतले.....

=============

क्षण मिठीतले.....

===================

क्षण मिठीतले वाटे गहिरे
ठोका काळजाचा चुकविणारे
हरपुनी भान, मिटुनी डोळे
ओठांनी चुंबूनी घेतले सारे

घोटुनी तव प्रेम गंध
जाहले मन मद्यधुंद
पावुनी तनु या कंप
शहारिले जणू ते सबंध

पाहुनी रूप तव बावरे
संयम मजला ना उरे
लाजण्याने तव, चित्त हरे
अन नजर ही तुजवर झुरे

वाटे घेउनि तुजला कवेत
जरा उंच उडवुनी हवेत
मग तसेच अलगद झेलुनी
हजार चुंबन घ्यावेत

शयनगृही नेउनि तुजला
वर्षाविन तुजवर प्रेमधारा
अन भिजवुनी मम शृंगाराने
अर्पीन देहात्मचित्त सारा

सारुनी हळूच तव पदर
पाहीन मुख ते साजिरं
घेउनि मग मऊ चादर
गाठू चादरीचं उदर

एक होता अपुली काया
कायासोबत अपुली छाया
क्षणही न व्यर्थता वाया
करीन तुजवर अपार माया

अखेरीस येता गोड सहवास
मिठीत मग घेउनि एकमेकांस
जरी होतसे मोकळा श्वास
ह्या क्षणांची पुन्हा लागे आस

                       अभिजित रोहिदास काळे

Sunday, 24 January 2016

तिचेच बोल आठवतो .....

===================

तिचेच बोल आठवतो ...... :)

=============================
तिचेच बोल पुन्हा पुन्हा आठवतो
नाही म्हटलं तरी पुन्हा तिलाच मनात साठवतो .......!! धृ  !!

तिच्या मधुर आवाजातली गाणी
आठवण येता तिची येतात माझ्या ध्यानी
मग हळूच हृदयाच्या आत तिला सजवतो .........!! १ !!

कधी कधी ती भलताच सल्ला देते
कारण नसतानाही माझे मन रमते तेथे
आणि मग तिच्याच स्वप्नात हरवतो .............!! २ !!

उगचच वाटू लागत ती बोलते तेच खरे
पण तिच्याविना तर भासच सारे
आणि पुन्हा तिचीच सुंदर काया आठवतो .........!! ३ !!

ती म्हणायची कुठेतरी दूर एकांतात जावे
मग तिथेच आपले जीवन गाणे गावे
आणि हेच बोल मी माझ्या कवितेत दडवितो.........!! ४ !!

ती नसताना उठत मनात आठवणीच वादळ
आणि मन तरंगात साचत तिच्याच प्रितीच तळ
तिथेच माझ्या भावनांची गर्दी दाटवतो ............!! ५ !!

तिला काय माहित तिच्या विना मी कसा जगतो
तिला होऊ नये त्रास म्हणून जगाच्या नजरा चुकवितो
तिच्याच साठी माझ्या कविता मी जुळवितो ..........!! ६ !!

तिचेच बोल पुन्हा पुन्हा आठवतो
नाही म्हटलं तरी पुन्हा तिलाच मनात साठवतो ......

                                        कवी :- विजय वाठोरे सरसमकर
                                         दि :- २५/०१/२०१५
                                          9975593359
                                        :police: http://sahilwathore.blogspot.in/ :police:
                                        :police: http://marathikavitamaherghar.blogspot.in/
=================================================================

ती म्हणते ......

ती म्हणते ......


ती म्हणते वेळ काढून
मलाही थोड भेटत जा ,
प्रत्यक्षात नाही झाल तर
किमान स्वप्नात येउन तरी बोलत जा  !

ती म्हणते नको होऊस भाऊक
स्वताच्या भावनांना आवर घालत जा ,
दिली कुणी आपुलकीची साद तर
त्या नात्याला शेवटपर्यंत टिकवत जा  !

ती म्हणते हृदयाची हाक ऐक
आणि क्षणभंगुर जीवनात प्रत्येक क्षण जपत जा ,
तो असेलही दुःखाचा नि सुखाचा पण
याचा समावेश किमान कवितेत तरी करत जा  !

ती म्हणते वेळ मिळालाच तर
समोरच्या व्यक्तीच्या भावना समजत जा ,
एखादी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही तरी
ती मिळेलच म्हणून जिद्द उराशी बाळगत जा  !

                               कवी :- विजय वाठोरे सरसमकर
                                      9975593359
                                     दि .24/01/2016
                               sahilwathore.blogspot.in
                               marathikavitamaherghar.blogspot.in
=====================================================

Saturday, 23 January 2016

"असे का होणार ?"

"असे का होणार ?"


असे का होणार,
तुझ्यासाठी रचलेले स्वप्न काय चुर-चुर होणार,
तुझ्या हृदयतील असणाऱ्या जागेत काय ?
दुसरच कोणी सहनार,
तु माझ्यासाठी रचलेला संसार काय ? दुसऱ्या सोबत निभावनर,
खरच असे का होणार ?

तुझ्या डोळ्यात जे होतो मि पाहणार स्वप्न,
 तु दुसऱ्याला दाखवणार ?
काय त्याला दुसरच कोणी ?
वस्तवात आणणार,
असे का होणार ?

जे हाथ मी धरणार ते अधिकार तु दुसऱ्याला देणार ,
जीथ मि मंगळसुत्र बांधणार, तो धागा दुसरच कोणी घेऊन येणार ,
काय हे अधिकार तु दुसऱ्याला देणार ?
माझ्या घरात हळदीच्या पावलाणी चालत येणार तिथे तु ,
दसऱ्याचा घर  सजवणार
असे का होणार ?

ज्या क्षणात तू दुसऱ्याची होणार , त्यावेळी माझ ह्रदय अगदी रक्तानी न्हाऊन निघणार ,
त्याच क्षणी माझी चिताहि रचली जाणार ,
अग्नी ही दिली जाणार,
तिथे तुही येणार पण अर्थ नसणार कारण ?

तुझ्या डोळ्यात दोन अश्रु असणार तिथे तुझा नाइलाज असणार आणि मी ,
मरुण ही हृदयात तुझ्या जिवंत असणार............

मॅडी
========================================================

सांग प्रिये...

सांग प्रिये

सांग प्रिये तुझ्या कपाळी हे कुंकु कुणाचं
तू तर माझं प्रेम मग मंगळसूत्र कुणाचं
आठवणीचे सरून दिवस काळोख्या राती
विरहाच्या दारी दोघांमधुनी पाय कुणाचं

सांग प्रिये
सांग प्रिये तू दुरावली ते दोष कुणाचं
नशिबी आल्या भाग्यावर जोर कुणाचं
जानवले ना कधी तुला गं भाव मनाचे
संगतीने बघितलेलं मग स्वप्न कुणाचं

सांग प्रिये
सांग प्रिये माझ्यासंगी हसणं कुणाचं
आठवणीत माझं चिडणं ते राग कुणाचं
सरता सरले दिवस कसे गेले संगतीचेे
रोजचं आता तुझ्याविना मरणं कुणाचं

रोजचं आता तुझ्याविना मरणं कुणाचं
-------------------------
शशिकांत शांडीले (SD), नागपूर

=======================================================

मन उदास उदास....

मन उदास उदास..........

मन उदास उदास,
सखे तुझ्या वाचून,
डोळे भरती ते पाण्याने,
मन तुझापासून दूर,

मन उदास उदास,
सारा भावनाचा खेळ,
का तुझ्या आठवणीवर जगण्याची,
आली माझ्यावर वेळ

मन उदास उदास,
तुझाच तो चेहरा डोळ्यासमोर ,
स्वप्न सुद्धा क्षणभगुर ती,
मनाच्या नाजूक वेलीवर,

मन उदास उदास,
सारखा मनाला तुझा तो ध्यास,
शेवटच्या श्वासापर्यंत होतील,
तू जवळ असल्याचे भास,

मन उदास उदास,
सखे तुझ्या वाचून ,
डोळे भरती ते पाण्याने ,
मन तुझापासून दूर,

ऋषिकेश सोनवणे
----------------------------------------------------------------------------------

काय सांगू तुला आज काय वाटत होते.

काय सांगू तुला आज काय वाटत होते. ....


काय सांगू तुला आज काय वाटत होते.
एकटे एकटे झाल्या सारखे आज भासत होते,
मन नव्हते थाऱ्यावर हे दिसत होते
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

खुश होतास तू तुझ्या जगात ,
पण मी आज एकटी पडले होते,
सगळ्या आठवणी एकवटून
 मी माझीच रडले होते,
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

भावनांनी छीनविछीन झालेलं
मन घेऊन मी बसले होते,
साऱ्या आठवणी अश्रू होऊन
माझ्यावर हसले होते.
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

समजावता समजावता त्यांना
दिवस रात्र लोटले होते,
तुझ्या प्रेमात अडकून ,
मी आज कायमची लुटले होते
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

ऋषिकेश सोनवणे
========================================================

** कवित्व **

** कवित्व  **


मी माझ जीवन
तुला अर्पण केल
मी माझ सर्वस्व
तुला देऊ केल

एवढ करूनही तू
म्हणतेस काय केल
हे ऎकून माझ
अंत:करणही मरून गेल

मन रक्ताळल, ठेचाळल
तरी त्यास आपलस केल
अखंड पेटलेल्या त्या मना
क्षणात शांत केल

फक्त रस्ता बदलला
म्हणून सगळ संपत गेल
तुझ्यामुळेच हे निथळ
कवित्व उदयास आल .

                   विजय वाठोरे सरसमकर
                   ता.हिमायतनगर जि.नांदेड
                   9975593359
======================================================

तुटल्या-फुटल्या काळजांनी एकदाच वाचावं... ‘प्रेम हे असंच असतं’

तुटल्या-फुटल्या काळजांनी एकदाच वाचावं... 

              ‘प्रेम हे असंच असतं’


जेव्हा ‘प्रेम हे असंच असतं’ हे सतीश टोणगे यांचं पुस्तक हातात पडलं तेव्हा पुस्तकात असणा-या प्रत्येक हिंदोळ्यावर वाचत-वाचत मन झुलत गेलं आणि पुस्तक कधी संपलं हे लक्षातही आलं नाही. 

‘प्रेम करणा-या प्रत्येकास हे पुस्तक प्रेमपूर्वक सादर’ या शब्दांनी पुस्तकाची सुरुवात होते. ‘तुझ्याशी एकरूप व्हावं वाटतं मला. तू तर माझ जग आहेस. त्याच जगात मला जगावंसं वाटतं’ अशा या पुस्तकातील ओळी मनात प्रेमाची एक तरल भावना निर्माण करतात. मातीची कूस उजवणा-या पाण्यासाठी पिंपळगावसह अनेक गावे धरणात गेली.त्याच धरणात गावाबरोबर गावातील माणसंही विस्कटली. अशा विस्कटलेल्या माणसांत गावातीलच भावकीने आजीला गाव सोडायला भाग पाडले. आजी कळंबला आली आणि तेथूनच आमच्या संघर्षपूर्ण जगण्याला सुरुवात झाली. संघर्षाच्या जगण्यातही लेखक सतीश टोणगे यांनी आपल्या काळजात प्रीतीचा झरा सतत वाहता ठेवला. गणेशाच्या साक्षीने प्रेमाच्या आठवणींना सुरुवात होते. तो सुखकर्ता म्हणत आपल्यालाही तुझ्या कृपेने प्रेमाचा आशीर्वाद मिळू दे म्हणणारा लेखक तिला प्रेम करण्याची सुबुद्धी देण्याची विनंती गणरायाला करतो. दिवाळीच्या सुटीत प्रत्येकाला आपल्या मामाच्या गावी जावंच वाटतं. तिथे असणा-या सगळ्याच नात्यात आपल्याला भावते ती मामाची पोरगीच. पण मामाला व मामीला आपलं नातं आवडत नाही. भाचा सोडून मामा दुस-याच एखाद्या मुलाच्या हातात पोरीचा हात देतो तेव्हा तिळतिळ तुटणारं काळीज तिच्या काळजीनं भरून येतं. आपण काय तिची काळजी घेतली नसती का? एका परक्याच्या हातात हात देऊन मामा मोकळा झाला. पण आपल्या आवडत्या माणसाच्या काळजीचा एक स्वर भाच्याच्या मनात सतत सलत राहिला. ‘आपल्या हातात काहीच नसतं रे. म्हणून मी तुला सांगते स्वप्न पूर्ण झालं नाही तर रडायचं नसतं. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्व काही आपल्यासाठी नसतं.’ या मामाच्या पोरीनं दिलेल्या पत्रातल्या ओळीने जगण्यात नवा उत्साह निर्माण केला यात काहीच शंका नाही. 

प्रेमाच्या विविध प्रकारच्या कथा काही अनुभवाचे सामथ्र्य दाखवून अनेकांना सहजपणे सावरून जातात तर काहींच्या मनात तुटलेल्या प्रेमाचा एक तुकडा सहजपणे चिकटून राहतो. जिच्यावर आपण प्रेम करतो त्या माणसाचं हसणं, तिचं दिसणं काळजाच्या आत खोल एक अनामिक ओढ निर्माण करतं. प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे प्रेम; परंतु त्यातूनही सावरणारे मन हा जगण्याला आशावादी करणारा विचार वाचकांना भावल्याशिवाय राहात नाही. माणसाने जगले पाहिजे, कॉलेजच्या कट्ट्यावरचे प्रेम किती खरे असते हे करणा-यालाच माहीत. जिच्याबरोबर जीवनसाथी बनण्याचे स्वप्न असते ती मात्र स्वप्नांची धुळधाण करून दुस-याच्या हातात हात घालून निघून जाते. ओघळणारे अश्रू आता थांबव आणि चल पुढच्या प्रवासाला. तिने मार्ग बदलला म्हणून तू रस्ता सोडण्याचा मूर्खपणा करू नकोस.जगण्याच्या प्रत्येक वळणावर फुलं फुलून येत नसतील, काटे तिच्या आसपास तर फुलांच्या हुंकाराने अलगद घ्यावे तिला कवेत आणि कराव्या जगण्याच्या-जागण्याच्या, एकमेकांत गुंतण्याच्या गोष्टी. ज्या गोष्टी सांगितल्या जातील पुन्हा आजी होऊन मांडीवर खेळणा-या नातवालाही एक वेगळ्या प्रकारच्या आशादायी भविष्याचा विचार लेखकाच्या मनातून पुस्तकात उतरल्याचे स्पष्टपणे जाणवते. 

आजही जपून ठेवल्यात पाकळ्या, तू दिलेल्या.. सुकून जरी गेल्या तरी हृदयात आहेत ओल्या..काळजातली ही ओल तुटलेल्या अनेकांसाठी आशावादी जगण्याची प्रचंड मोठी तागद मनात निर्मित करते. एकतर्फी प्रेमाने समाजात सात्विक प्रेमाला बदनाम केले आहे. हुंकारातून ओंकार आकारला जातो; पण निःशब्द भावनांना ओळखण्यासाठी स्वतःमध्ये प्रेमाची मोठी संकल्पना निर्माण होणे आवश्यक आहे. थोडा काळ घालवला की प्रेम आपल्या वळचणीला सहजपणे येते. त्यासाठी आपण जो काळ घालवणार आहोत तो केवळ आणि केवळ आपल्या पुस्तकाच्या विचारांमध्ये घालवला पाहिजे. आपलं ध्येय म्हणजे तिचे प्रेम मिळवणे असे न होता आपले ध्येय पहिल्यांदा स्वत:च्या पायावर उभा राहण्याचे आहे, जी स्वत:च्या पायावर उभा राहतात ती प्रेमात कधीही कोलमडत नाहीत. प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला सॉरी म्हणून फोन करणारी मुलगी काळजाच्या आत खोल खोल उतरते तेव्हा आपल्याला आपल्या प्रेमाची उंची कळते. मामाच्या गावी असणा-या आंब्याच्या बागेत मामाच्या पोरीकडं दुर्लक्ष करून मेघना नावाच्या सुंदर मुलीवर जीव लावणा-या पोरांचे आठवणीतील प्रेम वाचले की मामाच्या मुलीची नाराजी आठवते. प्रेमाच्या गुजगोष्टी आंब्याच्या बागेत चालणा-या, दुस-याच उन्हाळ्याच्या सुटीत तिचे लग्न झाल्याचे कळाल्यावर मनाची होणारी अवस्था शब्दांत मांडताना शब्दांच्या पलीकडले प्रेम सहज लक्षात येते. 

मला समजून घे म्हणणारा अजूनही वाट पाहतोय. प्रेमाच्या त्रिकोणातून बाहेर पडताना मनावर उमटणारे घाव काहीही झाले तरी लपवता येत नाहीत, दुस-याच्या हातात हात घालून दूर नजरेच्या पलीकडे जाणारी ती नुसती एकच स्मित करते, काळजाच्या आत खोल-खोल ते स्मित रुतत जाते. कोण होती ती? प्रेम हे असंच असतं, पहिलं प्रेम, अनोळखी, स्वप्नातलं प्रेम, ती आणि मी, एकदाच भेट तू, तू माझीच यांसारख्या लेखांतून लेखकाच्या जगण्याच्या विविध पैलूंचा अभ्यास होतो. पण शेवटपर्यंत कळत नाही की, या सगळ्या भावना एकाच जगण्यात एकाला कशा कळत आहेत. प्रत्येक कहाणी वेगळी, तरीही त्या कहाणीत फसलेला लेखक वाचताना सतत दिसत होता, ब-याच ठिकाणी व्याकुळ होणारं प्रेम, व्यक्त आणि अव्यक्तच्या पलीकडे जाताना दिसते. त्यांच्या विविध प्रकारच्या लेखांतून मामाच्या मुलीला प्रेम या संकल्पनेतून एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. या सगळ्या गोष्टी जरी ख-या खु-या वाटत असल्या तरी कल्पनांच्या आधाराने ब-याच वेळा सावरलेल्या दिसत आहेत. ‘प्रेम हे प्रेम असतं...तुमचं आमचं सेम असतं..’ या ओळीप्रमाणे आपल्या जगण्यात प्रेमाचा बहर येवो..शेवटी माझ्या कवितेने प्रेम या सुंदर भावनेच्या मुळापर्यंत पोहोचू... 
गुज सारे अंतरीचे कोण मला सांगतो, 
मी माझाच़ श्वास मलाच रोज मागतो 

कोण होती ती वेडी वेड लावूनी हुलकावणी, 
पावसात दिसते रोज 
माहेरची ती पाहुणी 
पाहणीचे चार दिवस मोरपंखी सावल्या, 
थरथरणा-या वेली या पाण्याकडे धावल्या, 
सारेच दिवस नसतात प्रेम प्रेम म्हणायचे, 
विरहाच्या विराणीत राख होऊन जगायचे..... 

या पुस्तकाचे लेखक सतीश टोणगे (कळंब, जि. उस्मानाबाद) असून, पुस्तकासाठी दैनिक ‘एकमत’ चे संपादक पांडुरंग कोळगे यांची प्रस्तावना असून हे पुस्तक लातूर येथील इंडो एंटरप्रायजेसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची किंमत प्रेम करणा-यांसाठी १०० रु. ठेवण्यात आली आहे. हे पुस्तक तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनणार असून अनंतराव आडसूळ, शिवाजी कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पुस्तक परीक्षण 
सुनील जवंजाळ, 
मु. पो. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर
==================================================================

कोण म्हटले दुःखाला कवटाळून रडावेच....

कोण म्हटले दुःखाला कवटाळून रडावेच....

कोण म्हटले दुःखाला कवटाळून रडावेच....
हसून डोळे पुसत दुःख ही जगून बघावे...
करावी दुआ त्या प्रत्तेक थेंबासाठी...
आणि खारफुटया गालानेही शरमीन लाजावे..
..........
कोण म्हटले दुःखाला कवटाळून रडावेच....
             -विद्रोही प्रेमवीर.
============================================

माना बात दिल की, हमे बताना नहीं आता.....

माना बात दिल की, हमे बताना नहीं आता....

माना बात दिल की, हमे बताना नहीं आता
झूठ तो ये भी हैं कि इश्क जताना नहीं आता।
.
लूटाने को बेसब्र हैं जो दिल में छिपी मोहब्बत
मसला बस ये हैं कि उसे कमाना नहीं आता।
.
पाकीजा जज्बातों पे वोे हार ही जाएगा आसानी से
तरह तरह की कोशिशों से उसे फँसाना नहीं आता
.
हैरत हैं कि जिस को पाया ही नहीं अब तक
फिर सपने में भी क्यो उसे गँवाना नहीं आता।

~ अनामिका
=========================================================

ऐलमा पैलमा गणेश देवा,

              ऐलमा पैलमा गणेश दे 

माझा नवरा बदलून दे, करीन तुझी सेवा.
जन्मोजन्मी कसल एका जन्मी झाले बो......र
मी नाही गुंडाळायची वडाला आता दोर,
कोणे एकेकाळी कसा फिदा होता माझ्यावर,
ओफिसातून थेट कसा घरी यायचा भरभर,
न चुकता घेऊन येत असे फूल आणि गजरा
व्हेलेंटाईन डे तर रोज व्हायचा साजरा.
ह्यांच्या नजरा ......त्यांच्या नजरा,
लागल्या आमच्या संसारा.
घर ,पाहुणे ,मुलांमध्ये मी झाले दंग,
बघता बघता रोमान्साचा झाला बेरंग,
क्षुल्लक कारणावरून उडू लागलेत खटके,
सासुबाईंचे मधे मध्ये शब्दिक फटके.
ओफिसातून घरी हल्ली रोज येतात लेट,
तुमच्यासाठी कमावतोय ही वरती भेट.
लोळण,पेपर,मित्र पत्ते हाच ह्यांचा रवीवार,
मुलांसंगे बाहेर जायला नाही म्हणे जमणार.
दहा वर्षात देवा माझी झाली अशी दैना
ह्यांनाच धडा शिकवायच आलय माझ्या मना
म्हणून म्हणते हात जोडून गणेश देवा ,
एक्सेंज ओफरचे तेव्हढे मनावर घ्याना.
मीच काय किती जणी करतील तुमची सेवा,
ऐलमा पैलमा गणेश देवा......... 

शिवाजी ला कोण पकडणार??



शिवाजी ला कोण पकडणार??
या बादशहा च्या प्रश्नावर
शाहस्त खान उठला अणि म्हणाला
.....
हुजुर ,,,,,,,,,,
........
हा घ्या भाला.....
अणि तुम्हीच तुमची आई घाल्ला,,,,,,
==========================

Friday, 22 January 2016

…बघ माझी आठवण येते का?

…बघ माझी आठवण येते का?


ग्लासभर दारु खिडकीत उभं राहून ढोसुन पहा
…बघ माझी आठवण येते का?
हात लांबव , ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
…बघ माझी आठवण येते का?
वा-याने उडणारा बियरचा फेस चेह-यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड ,
गुत्त्यावर ये, तो भरलेला असेलच,
टेबलावर हात ठेवुन बसुन रहा
खुर्ची सरकेल बुडाखाली,
…बघ माझी आठवण येते का?
मग पिऊ लाग, दारुचे अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा संपेपर्यत,
तो संपणार नाहिच , शेवटी घरी ये
कपडे बदलू नकोस, ग्लास पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता बेवड्यांची वाट बघ,
…बघ माझी आठवण येते का ?
दारावर बेल वाजेल ,
दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली बाटली घे ,
ओपनर तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या झिंगण्याचं कारण,
तू म्हणं ज्युस संपलंय
मग चिअर्स कर,
तूही घे…
तो उठून हिमेश रेशमिया लावेल,
तो तू बंद कर, किशोरचं शराबी लाव,
…बघ माझी आठवण येते का?
===========================================================

प्रेमाचा ठसका

प्रेमाचा ठसका 


पाय कसे कसे हाल व्हते प्रेमात
तिची जाते वरात ह्या लडते घरात || धृ ||
कुठ गेले कस्मे-वादे कुठ गेलं सपन
प्रेमाच शिखर जमिनीत झाल दफन 
मंग कानी एकटाच जाऊन बसत खोर्‍यात 
तिची जाते वरात ह्या लडते घरात || १ ||
बोलून सर गोड गोड आपसात केला घात 
प्रेमाच्या कुबड्यावर वज्जर मारली लात
नाही उरला फरक धोबीचा कुत्रा न् तुयात 
तिची जाते वरात ह्या लडते घरात || २ ||
चार दिवस प्रेमात मौजमजा केली 
प्रेमाच्या नावावर तिनं तुई चांगली शेकली 
बयाड झाल्यावानी ह्या फिरते मंग जंगलात 
तिची जाते वरात ह्या लडते घरात || ३ || 
रोज लपून भेटणं आता जाय भुलून
तिन देल्या वस्तू त्या दे फेकून 
सोन्याची अंगठी तिची निघाली टपरी भावात 
तिची जाते वरात ह्या लडते घरात || ४ || 

========================================================================



                                                 

मी तिला रोज पाहतो...

मी तिला रोज पाहतो,


मी तिला रोज पाहतो, पापण्यांच्या आड तिला दडवतो

प्रसन्न सकाळी तिची वाट पाहतो,वाटेवर तिच्यासाठी नयनफ़ुले अंथरतो
ती सहज बागडत येते , मी शांतपणे स्वप्नांचे निर्माल्य गोळा करतो

ती समोर असता नजर हटत नाही,तिची नजर वळता बेभान मन आवरतो
तिच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित,हळुच मनाच्या तिजोरीत साठवतो

काय वर्णावी ती मोहक अदा, जणू परिसाची जादू त्या नयनी
अमृताहून गोड असे वाणी , एका कटाक्षाने मी सुताने स्वर्ग गाठतो

बहुत असती भ्रमर फ़ुलांभोवती,इथे तर साक्षात कमळाचा थाट
प्रत्येक मनी एक आस, मीसुद्धा आशेचा जुगार पणास लावतो

कित्येक रस्तांमधे असा मधेच हरवलो,त्याची मोजदाद कशाला
नवीन खेळ, मात्र कायदे जुनेच, मला परत हरवायला

असु दे तरी, मनाला आवडतो हा फ़सवा लपंडाव
यावेळी तरी पुर्ण डाव जिंकीन, असतो मनी प्रबल भाव
पण पोतडीतला तो धीर,ऎन वेळी चोरवाटे पळ काढतो
उसन्या अवसानाचे ठिगळ जोडुनही, रोज आशेचे लक्तरं फ़ाडतो

म्हणून अद्याप तरी मी तिला रोज फ़क्त पाहतो, पापण्यांसोबत मग मनातलेही दडवतो
वाळवंटात का असेना, मृगजळात पोहण्याचे स्वप्न मात्र रोज पाहतो
________________________________________________
----कुणाल----
________________________________________________

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यात प्रेम करायचय मला ...


आयुष्यात प्रेम करायचय मला ...
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..!!!!!
___________________________________
---कुणाल---
________________________________

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात...


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.....
                                                              unknown author
======================================================================